शेअर बाजाराला मकरसंक्रांत लाभली, उच्चांकी उसळी

शेअर बाजाराला मकरसंक्रांत लाभली, उच्चांकी उसळी

मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शेअर बाजाराला मकरसंक्रांत लाभली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने उच्चांकी उसळी मारली. सेन्सेक्स ७३,३२७.९४ तर निफ्टी २२,०९७.४५ वर जाऊन पोहोचला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स ७५९.४८ तर निफ्टी २०२.९० अंशांनी वधारला. एका दिवसात सेन्सेक्समध्ये १.०५ टक्क्यांची तर निफ्टीत ०.९३ टक्क्यांची वाढ झाली. शेअर बाजारात झालेली ही विक्रमी वाढ आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी वधारल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान, तेल आणि गॅस क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये तसेच बँकांच्या शेअरमध्ये तेजी आल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी उसळी मारली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version