मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्याचा आक्षेप

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्याचा आक्षेप

मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर उद्धव गटाचे आमदार आदित्य यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यात अशासकीय लोकांचा भरणा आहे, असा आरोप आमदार आदित्य यांनी केला. बिनसरकारी लोकांचा खर्च सरकारने का करावा ? असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला. याआधीही सरकारी दौऱ्यांवर आदित्य यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्रत्येकवेळी आदित्य यांच्या प्रश्नांना राज्य शासनाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामुळे यावेळीही आदित्य यांच्या आरोपांना उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. आदित्य यांनी पत्रकार परिषद घेण्याआधी सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातील एका व्यक्तीच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना संबंधित व्यक्तीने लेखी उत्तर दिले. हे उत्तर संबंधिताने प्रसारमाध्यमांना पाठवले. यानंतर आमदार रोहित पवार यांनी नव्याने प्रश्न उपस्थित करणे टाळले आहे.

आमदार आदित्य यांना प्रसाद लाडांचे उत्तर

आदित्य यांनी मागे वळून बघावं. उद्धव सरकारच्या काळात तुम्ही किती पार्ट्या केल्या ? असा प्रश्न भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. दावोसमधील पार्टीचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका, असा इशारा प्रसाद लाड यांनी आदित्य यांना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version