बीडमध्ये भुजबळ मुर्दाबादच्या घोषणा

बीडमध्ये भुजबळ मुर्दाबादच्या घोषणा

बीड, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांची जाहीर सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून सभेपूर्वी ‘छगन भुजबळ मुर्दाबाद, छगन भुजबळ चले जाव’च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. छगन भुजबळ हे मंत्रिपदावर आहेत. त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करू नये. ओबीसींची सभा घ्यायची असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग सभा घ्यावी असे आवाहन या आंदोलकांनी केले.

भुजबळांचा जरांगेंना टोला

‘अभ्यास नसलेले नेते निर्माण झालेत… आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही’ या शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांना टोला लगावला. जर मराठे मुंबईत धडकणार असतील तर ओबीसीसुद्धा मुंबईला धडकू शकतात, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version