मुंबई, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे तिघे उपस्थित होते. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी संध्याकाळी येण्याची शक्यता आहे. या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी करायच्या उपायांवरही बैठकीत चर्चा झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.