पुणे, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयाने मंजूर केली होती. याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.
भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले, तेव्हापासून पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिले होते. एक याचिका दाखल करून घेत हा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने याच आदेशाला स्थगिती दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.