अखेर पोलीस महासंचालकपदाचा गुंता सुटला

अखेर पोलीस महासंचालकपदाचा गुंता सुटला

मुंबई, ४ जानेवारी २०२४. प्रतिनिधी : अखेर पोलीस महासंचालकपदाचा गुंता सुटला. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली. लवकरच रश्मी शुक्ला पदभार स्वीकारणार आहेत. याआधी रजनीश सेठ राज्याचे पोलीस महासंचालक होते. ते डिसेंबर २०२३ च्या अखेरच्या आठवड्यात निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर पुढील निर्णय होईपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. तर निवृत्त झालेल्या रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर पूर्णवेळ अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती होणार यावरून चर्चेला उधाण आले होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version