मुंबई, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक तुरुंगात जाण्याची शक्यता वाढली आहे. नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फेब्रुवारी २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. उपचारांसाठी मलिकांना तीन महिन्यांचा जामीन मिळाला होता. या जामिनाचा कालावधी ११ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. हा कालावधी संपण्याआधीच मलिक यांनी जामीन मिळवण्यासाठी नवा अर्ज केला. पण हा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. याआधी मुंबईच्या उच्च न्यायालयानेही हा अर्ज फेटाळला आहे. यामुळे जामिनाचा कालावधी संपल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात जाण्याची शक्यता वाढली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.