नाशिक विभागात २७२ शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक विभागात २७२ शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिक विभागात मागच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या काळात २७२ शेतकऱ्यांची आत्महत्या केली. शासकीय आकडेवारीनुसार नाशिक विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या जळगाव जिल्ह्यात तर सर्वात कमी आत्महत्या या नंदुरबार जिल्ह्यात झाल्या. जळगाव जिल्ह्यात १४०, नगर जिल्ह्यात ५९, धुळे जिल्ह्यात ५२, नाशिक जिल्ह्यात १२ आणि नंदुरबार जिल्ह्यात ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्यांची पोलीस चौकशी सुरू आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १०२ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीच्या चौकशीत शासकीय लाभासाठी पात्र ठरली तर ७८ प्रकरणे अपात्र ठरली. इतर ९२ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version