ट्रक, टँकर चालकांच्या संपात काँग्रेसचा ‘हात’ ?

ट्रक, टँकर चालकांच्या संपात काँग्रेसचा ‘हात’ ?

नवी दिल्ली, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नव्या मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर ट्रक, टँकर चालकांनी संप पुकारला आहे. अनेक महामार्गांवर चालकांनी टायर जाळले, रस्ते अडवले. या संपामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला. अत्यावश्यक सोयीसुविधांचा पुरवठा विस्कळीत झाला. काही ठिकाणी संपाला हिंसक वळण लागले. हिंसा थांबावी यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही जणांना ताब्यात घेतले. या देशाचा कारभार विस्कळीत करणाऱ्या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. ही चर्चा जोर धरू लागली असतानाच राहुल गांधी यांनी ट्वीट करून उघडपणे ट्रक, टँकर चालकांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version