मुंबई, १ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : उद्धव समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार बबनराव घोलप यांनी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे घोलप लवकरच उद्धव गटाला ‘जय महाराष्ट्र’ करून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. माजी आमदार बबनराव घोलप आणि मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भेट झाली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी न बोलता घोलप निघून गेले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. घोलप हे चर्मकार संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी संघटनेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.