ठाणे, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयासमोर सिनगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल अज्ञात व्यक्तीने प्रार्थनास्थळ व्यवस्थापनाला पाठवला. मेलची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथक, बॉम्बशोधक आणि निकामी करणारे पथक, घटनास्थळी पोहोचले. ठाणे पोलिसांनी प्रार्थनास्थळाभोवतीचे रस्ते खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद केले. यानंतर कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब आढळला नाही. आता पोलीस मेल कुठून आला याचा तपास करत आहेत. या तपासाकरिता सायबर विभागाची मदत घेण्याचा निर्णय झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.