…तरी माघार घेणार नाही, जरांगेंचा इशारा

…तरी माघार घेणार नाही, जरांगेंचा इशारा

जालना, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : आधी मराठ्यांना कुणबी करा आणि मागासवर्गीयांतून आरक्षणाचा लाभ द्या, अशी मागणी करणारे मनोज जरांगे आता थोडी वेगळी भाषा बोलू लागले आहेत. राज्य शासन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न सुरू असतानाच जरांगेंनी राज्य शासनाला धमकीवजा इशारा दिला आहे. ‘सरकारनं गोळ्या घातल्या तरी माघार नाही… सरकारला द्यायचं नसलं तरी मराठा आरक्षण घेणारच…’ असे जरांगे म्हणाले. ‘मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला’ असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. मुंबईच्या आंदेलनाची दिशा गुरुवारी २८ डिसेंबर २०२३ रोजी ठरवणार असे जरांगेंनी जाहीर केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version