मुंबई, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे एका व्यक्तीला भोवले आहे. याप्रकरणी पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी देखील या व्यक्तीविरोधात आक्रमक झाली आहे.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं नाव विशाल गोरडे असं आहे. विशालने सोशल मीडिया साईट फेसबुकवर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी याबाबत पोलिसाता तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून नवी मुंबईच्या सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन समूहात भांडण लावणे, हेतुपुरस्सर अपमान करणे, सोशल मीडियातून अश्लील साहित्य प्रकाशित करणे आदी कलमांतर्गत पोलिसांनी विशाल गोरडेंवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने आक्रमक होत काळं फासण्याचा इशारा देखील दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.