ठाणे, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात कोरोनाच्या नव्या जेएन १ व्हेरिएंटने टेन्शन वाढवले आहे. या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. देशासह राज्यात रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. रविवारी पुण्यात या नव्या विषाणूने बाधित दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता ठाण्यात देखील पाच रुग्ण आढळले असल्याने ठाणेकरांची धास्ती वाढली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
रविवारी ठाण्यात देखील कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने शिरकाव केला आहे. कोरोनाचा नवा व्हेरीयंट जेएन.१ चे पाच रुग्ण या ठिकाणी आढळले आहेत. यातील एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यामुळे कोरोना बंधित रुग्णांची संख्या २८ वर गेली आहे. या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणांना आणखी सतर्क राहण्याच्या सूचना राज्य आरोग्य विभागाने दिल्या आहे. पाच पैकी दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. राज्यात या नव्या विषाणूने बाधित नव्या ९ रुग्णांची रविवारी नोंद झाली. ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
खबरदारी म्हणून मास्क वापरणे बंधनकारक
देशात कोरोनाचा नवा विषाणू धुमाकूळ घालत आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वधू लागली आहे. सुट्टी साठी नागरीक गर्दीच्या ठिकाणी जात असून र्यटनसाठी बाहेर पडतांना आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.