बीड शहरातील शाळा शनिवारी बंद

बीड शहरातील शाळा शनिवारी बंद

बीड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शनिवारी बीड शहरातील मराठी इंग्रजी माध्यमातील सगळ्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीड शहरालगत शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “बीड शहरातील सर्व शाळा २३ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात यावे. याबाबत दक्षता घ्यावी” असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बीड शहरात आता एकूण तीन दिवस शाळा बंद असणार आहेत. कारण शनिवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी असेल आणि सोमवारी नाताळ सण असल्याने शासकीय सुट्टी असणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version