कोरोनाचा धोका तूर्त टळला

कोरोनाचा धोका तूर्त टळला

संभाजीनगर, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कोरोना संसर्गाच्या नव्या व्हेरिएंटची दहशत वाढत असताना शहरात सिडको भागात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने १४१ स्रणांची अॅण्टीजेन, आरटीपीसीआर चाचणी केली. त्यातील ८२ रुग्णांची अॅण्टीजेन चाचण्या निगेटिव्ह आल्या. ५९ पैकी ५८ रुग्णांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

संभाजीनगर शहरात सिडको एन-७ भागातील दहा वर्षांची मुलगी आणि ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह मेल्ट्रॉन हॉस्पिटल व पदमपुरा आयओसी केंद्रात दिवसभरात १४१ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version