टी – २०, एकदिवसीय आणि कसोटीत भारत अव्वलस्थानी

टी – २०, एकदिवसीय आणि कसोटीत भारत अव्वलस्थानी

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : आयसीसी गुणतक्त्यानुसार टी – २०, एकदिवसीय आणि कसोटी या तीन प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत अव्वलस्थानी आहे. टी – २० मध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारताने ६८ सामने खेळून १८ हजार ४१ गुणांसह २६५ चे रेटिंग मिळवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारताने ५६ सामने खेळून ६८०० गुणांसह १२१ चे रेटिंग मिळवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारताने २९ सामने खेळून ३४३४ गुणांसह ११८ चे रेटिंग मिळवले आहे. ही आकडेवारी सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी तयार केली आहे.

टी – २० मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडकडे २५७ चे तर तिसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडकडे २५५ चे रेटिंग आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडे ११७ चे तर तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे १०९ चे रेटिंग आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडे ११८ चे तर तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडकडे ११५ चे रेटिंग आहे. भारताने २९ कसोटीत ११८ चे रेटिंग मिळवले आहे तर ऑस्ट्रेलियाने ३० कसोटीत तेवढेच रेटिंग मिळवले आहे. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारत पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कामगिरीमुळे भारताचे आयसीसी गुणतक्त्यातील स्थान आणखी सुधारणार…

रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन – पावसामुळे रद्द
मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ – डकवर्थ लुईसनुसार दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून विजय
गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग – भारताचा १०६ धावांनी विजय
रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग – भारताचा ८ गडी राखून विजय
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ – दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून विजय
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल – भारताचा ७८ धावांनी विजय
मंगळवार २६ डिसेंबर २०२३ ते शनिवार ३० डिसेंबर २०२३ – पहिला कसोटी सामना, सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
बुधवार ३ जानेवारी २०२४ ते रविवार ७ जानेवारी २०२४ – दुसरा कसोटी सामना, न्यूलँड्स, केप टाऊन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version