नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन घुसखोरांमुळे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनामुळे गाजत आहे. संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्यावर बोलताना संसदीय कामकाजाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक खासदारांचे निलंबन झाले आहे. निलंबनाच्या कारवाईची सुरुवात शुक्रवार १५ डिसेंबर पासून झाली आणि मंगळवार १९ डिसेंबरपर्यंत संसदेतून १४१ खासदारांचे निलंबन झाले. लोकसभेतून मंगळवारी एका दिवसात ४९ खासदारांचे निलंबन झाले. काँग्रेसचे शशी थरूर, सुप्रिया गटाच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे याच्यासह एकूण ४९ खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.
विरोधकांची मागणी : संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन द्यावे. घुसखोरीच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा करावी.
कारवाईचे कारण : मागणी करताना संसदीय शिस्तीचे उल्लंघन करणे
कारवाई : हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन
शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून १३ खासदारांचे निलंबन
शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ : राज्यसभेतून तृणमूलच्या डेरेक ओ’ब्रायन यांचे निलंबन
सोमवार १८ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून ३३ खासदारांचे निलंबन
सोमवार १८ डिसेंबर २०२३ : राज्यसभेतून ४५ खासदारांचे निलंबन
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून ४९ खासदारांचे निलंबन
शुक्रवार ते मंगळवार या काळात संसदेतून १४१ खासदारांचे निलंबन
राज्यसभेच्या ४६ आणि लोकसभेच्या ९५ खासदारांचे निलंबन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.