केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी

केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी

पंढरपूर, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या काही भागांना दुष्काळाचा तडाखा बसला आहे. राज्य शासनाने २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या भागांमध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक राज्यात दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आले आहे. पथकाच्या अहवालाआधारे केंद्र सरकार राज्याला पुढील दुष्काळी मदत पाठवणार आहे. यामुळे केंद्रीय पथकाच्या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. केंद्रीय पथकाने माळशिरस आणि सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version