इथेनॉल निर्मितीत ऊसाचा रस वापरण्यावर बंदी

इथेनॉल निर्मितीत ऊसाचा रस वापरण्यावर बंदी

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इथेनॉल निर्मितीत ऊसाचा रस वापरण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील अनेक राज्यांमध्ये ऊसाच्या उत्पादनात यंदा घट दिसली आहे. यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे साखरेचे उत्पादन ४५ लाख टनांनी वाढणार आहे. साखरेच्या उत्पादनवाढीमुळे साखरेचा दर वधारण्याची शक्यता कमी होणार आहे. मागील सहा वर्षात साखर उत्पादनात वाढ होत होती. निर्यातीवरील बंधनांमुळे साखर गोदामात पडून होती. यामुळे अनेक साखर कारखानदार अडचणीत आले होते. साखरेच्या वाढत्या उत्पादनाला आळा घालण्यासाठी इथेनॉल निर्मितीत ऊसाचा रस वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मागच्या वर्षी ३२० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. कारखानदारांनी साखर निर्मितीसाठी वापरायचा ४० लाख मेट्रिक टन ऊसाचा रस इथेनॉल निर्मितीसाठी वापरला. इथेनॉलला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदार यांना फायदा झाला. देशात मागच्यावर्षी १२५० कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यात आले. यातील सत्तर टक्के निर्मिती ही ऊसाच्या रसापासून करण्यात आली. इतर धान्यापासून तीस टक्के निर्मिती झाली. यंदा मात्र महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यात अनियमित, अवेळी पडलेला पाऊस, दुष्काळ यामुळे ऊसाचे उत्पादन आणि क्षेत्र दोन्हीही घटले आहे. याचा परिणाम म्हणून वीस टक्के उत्पादन कमी होणार असल्याने इथेनॉल निर्मितीत ऊसाचा रस वापरण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version