नवाब मलिक सत्ताधारी बाकावर

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : काही काळ तुरुंगात राहिलेले आणि गंभीर आरोपांत जामिनावर असलेले नवाब मलिक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसलेले दिसले. मलिक सत्ताधारी बाजूस शेवटच्या बाकावर बसले होते.

मंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक संकटात सापडले. मलिक यांनी केलेल्या एका भूखंड व्यवहारावरून आरोपांना उधाण आले. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोट कटाशी संबंधित असलेल्यांसोबत आर्थिक व्यवहार केला. या व्यवहारातून कटाशी संबंधित असलेल्यांना आर्थिक लाभ झाला. आर्थिक अफरातफर करण्यात आली, असे आरोप होते. या प्रकरणात नवाब मलिक तुरुंगात गेले त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण मलिक यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले नाही. आता जामिनावर असलेले मलिक सत्ताधारी गटासोबत दिसले. या मुद्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना उत्तर दिले. या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version