नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने २१ खासदारांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी दिलेल्यांपैकी १२ खासदार विजयी झाले. विजयी झालेल्या १२ जणांपैकी १० खासदारांनी बुधवारी ६ डिसेंबर रोजी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह हे दोन खासदार विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. पण त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.
राजीनामा देणारे मध्य प्रदेशातील खासदार
नरेंद्र सिंह तोमर
प्रल्हाद सिंह पटेल
राकेश सिंह
उदय प्रताप
रिती पाठक
राजीनामा देणारे छत्तीसगडमधील खासदार
अरुण साव
गोमती साई
राजीनामा देणारे मध्य राजस्थानातील खासदार
राजवर्धन सिंह राठोड
दिया कुमारी
किरोडी लाल मीणा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.