पोलिसांच्या कुटुंबियांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता ‘प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजने’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत १ डिसेंबर रोजी ताडदेव आणि वरळी येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या प्रशिक्षण वर्गामध्ये पोलीस आणि पोलिसांच्या कुटुंबातील वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरुष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे नोंदणी करू शकतील. ताडदेव पोलीस वसाहत मैदान, वसंतराव नाईक मार्ग, ताडदेव मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता तर मुंबई पोलीस कौन्सिलिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३, वरळी येथे सकाळी ११.३० वाजता या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version