डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

नागपूर, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. हे अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडेल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण – नागपूर
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी – ७ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version