मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. तर मनसेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. अद्याप मुंबईतील अनेक दुकानांवर मराठी पाट्या लावल्याचे दिसत नाही. अशा दुकानांवर मुंबई महापालिका प्रशासन कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी पालिकेची धडक कारवाई सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.