जालना, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आंतरवाली सराटी प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरे याला २ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ऋषिकेशवर आंतरवाली सराटी येथे पोलिसांवर दगडफेक करणे आणि कायदा सुव्यवस्थे बिघडवणे असा आरोप आहे. पण मंगळवारी त्याला दुसऱ्या प्रकरणात न्यायंदडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. अंबड येथील प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांनी त्याला पोलीस कोठडी ठोठावली. पिस्तुल तसेच जिवंत काडतूस सापडल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.