मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली…

मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली…

मुंबई, २८ नोव्हेंर २०२३, प्रतिनिधी : दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली आहे. अद्याप ज्यांनी दुकानांवर मराठी पाट्या लावलेल्या नाहीत अशांवर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. तर मनसेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. अद्याप मुंबईतील अनेक दुकानांवर मराठी पाट्या लावल्याचे दिसत नाही. अशा दुकानांवर मुंबई महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने २४ प्रभागांमध्ये ७५ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकांची नेमणूक केली आहे. महापालिका पाहणी करून ज्यांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version