संतापले दीपक केसरकर

संतापले दीपक केसरकर

बीड, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर संतापले. मुलाखत सुरू असताना घुसखोरी करणार असल्यास अपात्र करेन, अशा शब्दात केसरकर यांनी एका महिलेला सुनावले. बीडमध्ये एका कार्यक्रमस्थळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. प्रश्नोत्तरे सुरू असताना एक महिला तिथे आली. या महिलेने हस्तक्षेप करून केसरकर आणि पत्रकार यांच्यातील संवाद थांबवला.

शिक्षक भरतीची पुढील प्रकिया होत नाही… किती वेळ वाट बघायची… असे प्रश्न महिलेने विचारले. महिलेच्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षक भरतीची प्रक्रिया नियमानुसार होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. मुलाखत सुरू असताना घुसखोरी करणार असल्यास अपात्र करेन, या शब्दात केसरकर यांनी शिक्षक भरतीचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या महिलेला सुनावले. आमच्यासाठी विद्यार्थी महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून नियमानुसार शिक्षक भरती सुरू असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version