ठाणे, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाण्यातील वाघबीळमध्ये मढवी निवास बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीचा धूर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेला. धुरामुळे गुदमरून अभिमन्यू मढवी (६०) आणि रमाबाई मढवी (५५) यांचा मृत्यू झाला. प्रणाली मढवी (३०), कविश मढवी (१३), पलाश मढवी (१२) वाचले, ते आगीतून सुखरूप बाहेर पडले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. पोलीस या प्रकरणात अधित तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.