जरांगे यांची भुजबळांवर पुन्हा टीका

जरांगे यांची भुजबळांवर पुन्हा टीका

नाशिक, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : हुशार आणि अनुभवी माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं, ती मोठी माणसं आहेत. त्यांना डावपेच माहिती आहेत, सुख गिळणाऱ्या माणसाबद्दल आपण काही बोलत नाही, या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली. नाशिक हा जिल्हा एका माणसाचा नाही, हा जिल्हा सगळ्यांचा आहे. समाज या जिल्ह्याचा मालक आहे; असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. भुजबळांनी साथ दिली असती तर दोन तासांत मराठ्यांना आरक्षण मिळालेल असते, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

‘भुजबळ हुशार, त्यांना डावपेच माहिती आहेत’
जरांगे यांची भुजबळांवर पुन्हा टीका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version