‘होऊ द्या गुन्हे दाखल पाहून घेऊ’

‘होऊ द्या गुन्हे दाखल पाहून घेऊ’

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: सकल मराठा मोर्चाच्या रस्त्री उशिरा झालेल्या सभा वर आता आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत कल्याणात काल रात्री उशिरा ११ वाजून १५ मिनिटांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘क्लीन चिट’ दिल्याची माहिती कथितरीत्या फोडल्याप्रकरणी देशमुख यांची कन्या पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. संस्थेने सन २०२१ मध्ये सादर केलेल्या अंतर्गत अहवालात ही क्लीन चिट दिली, अशी माहिती त्यावेळी प्रसृत झाली होती.

सीबीआयने सोमवारी या प्रकरणात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पूजा आणि राहत यांची नावे कट रचण्यातील साथीदार म्हणून समाविष्ट केली आहेत. या दोघींनी देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्या प्रवासाची सोय केली. त्याद्वारेच डागा यांनी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन त्यांच्याकडून या अहवालाचा मसुदा मिळवला, असे आरोपपत्रात म्हटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेलचालक आणि बारचालकांकडून खंडणी गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्या आरोपाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. या तपासाचा अहवाल सीबीआयने न्यायालयात सादर केला. ‘देशमुख यांच्याकडून कोणताही दखलपात्र गुन्हा घडलेला नाही’, असे अहवालात म्हटल्याची माहिती त्यावेळी फुटली होती. या प्रकरणात सीबीआयने अभिषेक तिवारी आणि आनंद डागा यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केले आहे.

त्याच प्रकरणात सीबीआयने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये पूजा आणि राहत यांच्याखेरीज अनिल देशमुख यांचा दूरचा नातेवाईक विक्रम देशमुख आणि सत्यजीत वायाळ नामक व्यक्तीचाही समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version