ललित प्रकरणी २ पोलीस बडतर्फ

ललित प्रकरणी २ पोलीस बडतर्फ

पुणे, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ललित पाटील प्रकरणात पोलीस हवालदार नाथा काळे आणि अमित जाधव या दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली म्हणून दोन दिवसांपूर्वी या दोन्ही पोलिसांना अटक झाली होती. पुणे क्राईम ब्रँचने ही कारवाई केली होती. चौकशी केल्यानंतर या दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्यात आली. ललित पाटील येरवडा तुरुंगात असताना आजारपणाचे कारण देऊन दीर्घ काळापासून पुण्याच्या ससून रुग्णालयात होता. रुग्णालयालयात पोलीस हवालदार नाथा काळे आणि अमित जाधव बंदोबस्ताचे काम करत होते. ललित ससूनमधून पळून एका खासगी हॉटेलमध्ये गेला होता. याच हॉटेलमध्ये थोड्या वेळाने नाथा काळे पोहोचला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले. यानंतर पोलीस हवालदार नाथा काळे आणि अमित जाधव या दोघांच्या अडचणीत वाढ झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version