धुरक्यात हरवली मुंबई!

धुरक्यात हरवली मुंबई!

विकासाच्या बळावर मानव चंद्राकडे वाटचाल करत असतानाच दुसरी विकास आणि निसर्ग यांचा समतोल राखण्यात मानवालाच अपयश येत आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असून, ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे. याचे उदाहरण म्हणजे मुंबईतील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे हवेची खालावलेली गुणवत्ता आणि याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.

दिल्लीसह उत्तर भारतात गेल्या काही वर्षांपासून वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब असताना त्याचा अभ्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक पालिका प्रशासनाने विशेष करून मुंबई महानगरातील पालिकांनी करणे गरजेचे होते. मात्र ‘तहान लागल्यावर विहीर खणणे’ या प्रकारात मोडणाऱ्या मुंबई महापालिकेने वर्षभरापूर्वी प्रदूषणाची धोक्याची घंटा मिळूनही त्यावर उपाययोजना करण्याचे गांभीर्य दाखवले नाही आणि दुर्लक्ष केले. देशाची आर्थिक राजधानीत मोठ्या प्रमाणात होणारी विकासकामे, उभी राहणारी बांधकामे, वाढलेली वाहनसंख्या यांमुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणावर अचानक ‘मार्गदर्शक तत्त्वांचा’ मारा करून प्रदूषण रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version