मुंबईकरांचे पाणी महागण्याची शक्यता

मुंबईकरांचे पाणी महागण्याची शक्यता

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईकरांच्या पाणीपट्टीत आठ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. जल अभियंता विभागाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पाणीपट्टीत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर २५ नोव्हेंबर पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा निर्णय झाला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.

मुंबईकरांना दरवर्षी मुंबई महापालिका ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. ही व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सतत खर्च करावा लागतो. या खर्चासाठी दरवर्षी पाणीपट्टीत कमाल आठ टक्क्यांची वाढ करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार २०२२ – २३ मध्ये पाणीपट्टीत ७.२१ टक्क्यांची वाढ करण्यात आली. आता २०२३ – २४ साठीचा निर्णय २५ नोव्हेंबर पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version