मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर रस्ता रोको

मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर रस्ता रोको

छत्रपती संभाजीनगर, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पुढाऱ्यांनी रोखून धरले आहे. हे पाणी तातडीने सोडावे, या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर (सिंचन भवन) सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात आला आहे.

यंदा मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे विभागातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी, अनेक गावांची तहान टँकरवर भागवावी लागत आहे.अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणांतून मराठवाड्याला पाणीसर्वपक्षीय सिंचन भवनसमोर रस्ता रोको करण्यात आला आहे. या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे,माजी मंत्री अर्जून खोतकर,आमदार संजय शिरसाट, माजी मंत्री अनिल पटेल, आमदार कल्याण काळे,माजी आमदार संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version