जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा

जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा

जेजुरी, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी सजली आहे. जेजुरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

तुळजापूरमध्ये भेंडोळी सोहळा

तुळजापूरमध्ये रविवारी रात्री भेंडोळी सोहळा साजरा करण्यात आला. काळभैरव मंदिरात रात्री आठ वाजता देवीच्या पोताने भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. नंतर ही भेंडोळी करून तरुणांचे पथक तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आले. तिथे भेंडोळीचे पूजन करण्यात आले. यानंतर तरुणांच्या पथकाने भेंडोळी हाती धरून मंदिराला प्रदक्षिणा घातली. राजेशहाजी महाद्वारमार्गे तरुणांचे पथक घेऊन कमानवेस ओलांडून तरुणांचे पथक मारुती मंदिरात दाखल झाले. तिथे मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर भेंडोळी पाण्याचा वापर करून शांत करण्यात आली. यानंतर तुळजाभवानीला अभिषेक करण्यात आला. नित्योपचार करून देवीचे पूजन करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version