‘कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगात व्हावं’

‘कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगात व्हावं’

जालना, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगात व्हावं’ अशी मागणी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठवाड्यात नोंदी तपासण्यासाठी मनुष्यबळ वाढवा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांनी ही मागणी केली. सरसकट मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशीही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ‘कुणबी नोंदी शोधण्यासाठी साधारण किती कालावधी लागेल याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावं. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे

‘मराठवाड्यात नोंदी तपासणीत संख्याबळ कमी’
‘मुख्यमंत्र्यांनी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावं’
जरांगेंची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया
‘मुख्यमंत्र्यांनी लवकरच वेळ सांगावी’

‘भुजबळ किती जातींना विरोध करणार’

महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. या विरोधावर प्रतिक्रिया देताना ‘भुजबळ किती जातींना विरोध करणार’ असा प्रश्न मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाचे मुद्दे

‘भुजबळ किती जातींना विरोध करणार’
‘भुजबळांची फजिती झालीय असं दिसतंय’
जरांगेंचा भुजबळांवर निशाणा

‘कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे सत्य काय ?’

ज्या मराठ्यांच्या आधीच्या पिढ्यांच्या कुणबी नोंद आढळत आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार, असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. पण कुणब्यांच्या जुन्या नोंदी दाखवून मराठ्यांना फसवू नये. ‘कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे सत्य काय ?’ ‘आतापर्यंत किती मराठ्यांना नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र दिलंय’ असे प्रश्न मराठा क्रांती ठोक मोर्चाने उपस्थित केले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

‘कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे सत्य काय ?’
‘प्रशासनाने जुन्या नोंदी दाखवून मराठ्यांना फसवू नये’
मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version