मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता रात्री साडेदहा ऐवजी रात्री अकरा वाजता सुटेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली. या निर्णयानुसार शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे.
यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री अकरापर्यंत सुरक्षित प्रवास करता येईल. मेट्रोने रात्री अकरापर्यंत प्रवास करण्याची सोय फक्त दिवाळीपुरती नाही तर कायमची केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता रात्री साडेदहा ऐवजी रात्री अकरा वाजता सुटणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.