‘भुजबळ निवडून कसे येतात तेच पाहतो’

‘भुजबळ निवडून कसे येतात तेच पाहतो’

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे विनाकारण तणाव निर्माण होत आहे. जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्यानंतर दोन दिवस गेले. यानंतर भुजबळ यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे वक्तव्य केले. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचे चित्र निर्माण होऊ लागल्याचा आरोप मराठा समन्वयक अंकुश कदम यांनी केला. भुजबळांसारखे जबाबदार मंत्री असे करणार असतील तर ते आगामी विधानसभा निवडणुकीत कसे निवडून येतात तेच पाहतो, असा इशारा अंकुश कदम यांनी दिला. ते ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या लक्ष्यवेधी कार्यक्रमात बोलत होते.

‘भुजबळ निवडून कसे येतात तेच पाहतो’, अंकुश कदम यांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version