राष्ट्रीय ब्रश दिवस

राष्ट्रीय ब्रश दिवस

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय टूथब्रश दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दातांचे आरोग्य जपण्यासाठी जनजागृती केली जाते. प्रामुख्याने ही जनजागृती मुलांमध्ये केली जाते.

‘स्वच्छ मुख आरोग्य’ कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय टूथब्रश दिवस’- ०७ नोव्हेंबर रोजी जनमानसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राष्ट्रीय टूथब्रश दिवस जनतेत मौखिक आरोग्यविषयक जनजागृती तसेच दिवसांतून दोन वेळा टूथ ब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी, या उद्देशाने साजरा केला जातो. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये जागरुकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जनजागृतीसाठी विविध दंत महाविद्यालये, सामाजिक संस्था हिरिरीने पुढाकार घेऊन पोस्टर्स, बॅनर्स, रॅली, पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version