मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी विशेष प्रशासकीय कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षांमार्फत कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी पडताळण्याचे काम केले जाणार आहे. या कामाचे नियोजन करण्यासाठी माजी न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे पाच समर्थक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी विशेष प्रशासकीय कक्ष
तपासणीच्या कामात मोडी लिपीच्या अभ्यासकांची मदत घेणार
कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी पडताळणार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.