मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीने एकत्रितरित्या १४०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीत ७५० पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपाने राज्यात पहिले स्थान पटकावले. या यशासाठी महायुतीच्या नेत्यांनी मतदारांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, या शब्दात भाजपाने मतदारांचे आभार मानले.
महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
ग्रामपंचायती : २३५९
महायुती : १३३६
मविआ : ५२६
अपक्ष : ३४६
महायुतीला कौल
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवून राज्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या आमच्या महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला. भविष्यातही ही विकासाची घोडदौड अशी सुरु राहील आणि जनतेच्या पाठिंब्याने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून देऊ. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो; अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले.
महायुतीच्या कामगिरीला जनतेचा कौल
हा महायुती सरकारच्या कामगिरीला राज्यातील जनतेने दिलेला कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या चौदाशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत साडेसातशेहून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार; या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले.
जळगाव जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
शिंदे गट ६३
भाजप ५४
अजित पवार २२
शरद पवार ११
काँग्रेस ०४
ठाकरे गट ०३
प्रहार ०१
अपक्ष ०८
अर्ज न आल्याने रिक्त ग्रामपंचायत ०१
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
भाजप – ०५
शिंदे गट – ०६
अजित पवार गट – ११
उद्धव ठाकरे गट – ०५
काँग्रेस – ०५
शरद पवार गट – ०५
मनसे – ०२
इतर – ०८
स्थगित – ०१
महायुतीला स्वीकारले, मविआला झिडकारले
ग्रामपंचायतीत राज्याचा कौल महायुतीला
राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुतण्यानं काटा काढलाच, काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व
मविआत गेलेल्या उद्धव गटाची वाताहत, महाराष्ट्राने नाकारले उद्धव गटाला
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.