फडणवीसांनी दिला दम

फडणवीसांनी दिला दम

नागपूर, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राजकारण्यांनी आरोप करताना विचार करावा. आम्ही हिशेब करायला लागलो तर अनेक नेते अडचणीत येतील या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दम दिला. फडणवीस यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नाही. पण त्यांच्या वक्तव्याचा रोख उद्धव गटाच्या नेत्यांकडे होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मागील काही महिन्यांपासून दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर राजकीय आरोप करण्यात उद्धव गट आघाडीवर आहे. न्यायालात टिकतील असे ठोस पुरावे सादर करण्याऐवजी फक्त आरोप करणे सुरू आहे. उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यात आघाडीवर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजय राऊत यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एल्विशला वर्षावर आणणारा खासदार नशेखोर असल्याचा आरोप केला होता. पण नशेखोर कोण हे सांगणे टाळले होते. यानंतर नितेश राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ‘आदित्य डिनोसोबत काय करायचा ?’ असा सवाल केला. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी कोणाचेही नाव न घेता हिशेब करायला लागलो तर अनेक नेते अडचणीत येतील असा स्पष्ट इशारा दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version