मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि दोन हजार ९५० सदस्य पदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी रविवार ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील मतमोजणी मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.