कांदा निर्यातीला आळा बसणार ?

कांदा निर्यातीला आळा बसणार ?

नाशिक, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात कांद्याच्या बाजारभावाने पन्नाशी पार केली आहे. त्यामुळे, किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. बाजारभाव नियंत्रणात येण्यासाठी केंद्राने निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य दुप्पट आठशे डॉलर एवढे वाढविले आहे. यामुळे कांदा निर्यातीवर आळा बसण्याची शक्यता आहे, असे मत चाकण येथील व्यापारी व शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शेतकरी व्यापाऱ्यांकडील साठविलेल्या कांद्याचा साठा संपत आला असल्याने कांद्याचं बाजारभावात वाढ होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात मूल्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान मूल्य दुप्पट करून आठशे अमेरिकन डॉलर केले आहे. यामुळे परदेशी खरेदीदारांना पूर्वीच्या चारशे डॉलरच्या तुलनेत दुप्पट किमतीने कांदा खरेदी करावा लागणार आहे. कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत आठशे रुपये किमान विक्री मूल्याची मर्यादा लागू राहणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version