नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मद्य विक्री घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांची गुरुवार दोन नोव्हेंबर रोजी चौकशी होणार आहे. मद्य विक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार तुरुंगात आहेत. सिसोदिया यांनी वारंवार जामीन मिळवण्यासाठी केलेले अर्ज फेटाळले जात आहेत. मागच्या आठवड्यात उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना या प्रकरणात प्रथमदर्शनी ठोस पुरावे आढळत असल्याचे सूतोवाच केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.