पनवेलमध्ये पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये पाणीपुरवठा बंद

पनवेल, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पनवेलमध्ये सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कामं पूर्ण झाल्यानंतर बुधवार १ नोव्हेंबर पर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत विद्युत कामं, स्थापत्य कामं व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामं केली जातील.

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पनवेलमध्ये सलग दुसऱ्यांदा मोठ्या कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद करून देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद केला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version