जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

जालना, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : टिकणारे आश्वासन देणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तरी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न शासनाच्या पातळीवरून सुरू आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना फोन केला आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाला आणखी थोडा वेळ हवा आहे, असे महाजन म्हणाले. तर अद्याप मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत त्यामुळे शासनावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

महत्त्वाचे

गिरीश महाजनांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न
‘अजून गुन्हे मागे घेतले नाही, तुम्ही आरक्षण कसं देणार ?’
मनोज जरांगेंचा सवाल, फोनवरुन संभाषण
तर आणखी थोडावेळ देण्याची महाजनांची मागणी

‘जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी’
संभाजीराजे यांची विनंती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version