‘जय महाराष्ट्र’च्या ‘लक्षवेधी’ चर्चेची मराठा आंदोलकांकडून दखल

‘जय महाराष्ट्र’च्या ‘लक्षवेधी’ चर्चेची मराठा आंदोलकांकडून दखल

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘जय महाराष्ट्र’च्या ‘लक्षवेधी’ चर्चेची मराठा आंदोलकांकडून दखल घेण्यात आली. मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत ‘जय महाराष्ट्र’च्या ‘लक्षवेधी’ चर्चेचा व्हिडीओ दाखवला. आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांमध्ये फूट नको असे वक्तव्य आंदोलकांनी ‘लक्षवेधी’ चर्चेच्या आधारे केले.

‘जय महाराष्ट्र’च्या ‘लक्षवेधी’ चर्चेची मराठा आंदोलकांकडून दखल
आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांमध्ये फूट नको
आंदोलकांचं ‘लक्षवेधी’ चर्चेच्या आधारे वक्तव्य

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे. यासाठी आवश्यक ते कायदेशीर उपाय राज्य शासनाने करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण लाटायचे नाही. पण ओबीसींकडे असलेले अतिरिक्त आरक्षण मराठ्यांना दिले तर पन्नास टक्के आरक्षणाच्या अटीचे उल्लंघन होणार नाही आणि ओबीसी तसेच मराठा या दोन्ही समाजांना आरक्षणाचा फायदा होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

‘आरक्षण असणारे ओबीसी मोर्चात कशाला जातायत ?’
जरांगेंच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर अजित पवारांचे प्रश्नचिन्ह

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version