उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या माढा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या माढा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. तसेच सकल मराठा समाजाने दौर्‍याला विरोध केला आहे. जिल्ह्यात येण्यापूर्वी आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे.

माढा तालुक्यातील गंगामाईनगर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा २३ वा ऊस गाळप हंगाम शुभारंभ आणि शेतकरी संवाद मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणावरून माढा तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला होता आणि त्यांनी अजित पवार यांना माढयामध्ये प्रवेश बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version